दौलताबाद
इतिहास
१२वे शतक
बदामिचे चालुक्य, कल्याणचे चालुक्य, मौर्य, शुंग, सातवाहन, हल(हाला), शक क्षत्रप, सतकर्णी, वाकाटक, नल, विंध्यसेना, प्रवरसेना, राष्ट्रकूट यांच्यानंतर बाराव्या शतकाच्या शेवटच्या २५ वर्षात देवगिरीच्या यादवांचा उदय खानदेश परिसरात झाला पहिल्या सेऊनचंद्राच्या तेव्हाच्या सेऊनदेशात (आताचा खानदेशात) नाशिक ते देवगिरीचाही समावेश होता. कृष्णा नदीच्या उत्तरेकडे वर्चस्व प्रस्थापित करणाऱ्या या यादव वंशातील भिल्लमा(२) या राजपुत्राने देवगिरी गावाची स्थापना करून पुढे तेथून राज्य चालवले.
पुढे सिघंण्णा व त्यानंतर त्याचा नातू कृष्ण यांनी राज्य वाढवले. या कृष्णाचा भाऊ महादेव याच्या अचूक तारीख २९ ऑगस्ट १२६१ अशी असल्याचे निश्चित झाले आहे. त्याने उत्तर कोकणचा प्रदेश आपल्या राज्यास जोडण्यात यश प्राप्त केले आणि गादी आपला मुलगा आमण्णाकडे सोपविली. पण कृष्णाचा मुलगा रामचंद्राने बंड करून गादी स्वत:कडे खेचली आणि विदर्भ आणि इतरत्रही विजय प्राप्त केले.मात्र, १२९६मध्ये झालेल्या अल्लाउद्दीन खिलजीच्या आकस्मिक हल्ल्यास रामचंद्र तोंड देऊ शकला नाही.
इ.स. १२९६ ते इ.स. १३१०
१२९६ मध्ये अल्लाउद्दीन खिलजी या उत्तरेतील सुलतानाने प्रथम दख्खन प्रांतात प्रवेश करून यादवांचा पराभव केला आणि त्यांची संपत्ती लुटून त्यांना दरिद्री बनवले. सेनापती मलीक कफूर याने अल्लाउद्दीनचे काम पुढे चालू ठेवले आणि इ.स. १३१० मध्ये यादवांची सत्ता लयाला गेली.
इ.स.१३१० ते इ.स.१३४७
अल्लाउद्दीनचे अनुकरण मुहम्मद बिन तुघलक (इ.स. १३२४-१३५०) या दिल्लीच्या सुलतानाने करून आपली सत्ता दक्षिणेतील मदुराईपर्यंत वाढवत केली. १३२६ मध्ये मुहम्मद बिन तुघलक ऊर्फ वेडा महंमद[ संदर्भ हवा ]या दिल्लीच्या सुलतानाने आपली राजधानी देवगिरीवर आणली व देवगिरीचे नाव दौलताबाद केले. दिल्लीहून आपली राजधानी दौलताबादेस आणण्याचा त्याचा प्रयत्न असफल झाला. ही राजधानी परत दिल्लीला न्यावी लागली.
देवगिरी किल्लावर पंचधातूंनी बनवलेला एक तोफ आहे . तोफ किल्लावर बनवली आहे . त्या तोफ मध्ये एक शहर उध्वस्त करण्याची शक्ती आहे .या तोफेवरील कोरलेली माहिती हि पारशी भाषेतील आहे .
इ.स. १३४७ ते इ.स.१५००
तुघलकांची सत्ता क्षीण झाल्यावर अल्लाउद्दीन हसन बहामनी याच्या धुरीणत्वाखाली दक्षिणेत इ.स. १३४७ साली बहामनी घराण्याची स्थापना झाली. ते राज्य सुमारे १५० वर्षे टिकले. देवगिरी अथवा दौलताबाद ही बहामनींची काही काळ राजधानी होती. सोळाव्या शतकात बहामनी राज्याचे गोवळकोंड्याची कुतुबशाही, अहमदनगरची निजामशाही, वऱ्हाडची इमादशाही, विजापूरची आदिलशाही आणि बिदरची बरीदशाही अशा पाच स्वतंत्र राज्यांत विभाजन झाले. आपली सत्ता टिकविण्याकरिता या दख्खनी सुलतानांना प्रशासनासाठी स्थानिक मराठी लोकांचे मोठ्या प्रमाणावर साहाय्य घ्यावे लागले. सनदी सेवा, लष्करी चाकरी आणि राजनैतिक व्यवहार यासाठी प्रामुख्याने त्यांना मराठी माणसांचीच नेमणूक करावी लागली. सतराव्या शतकाच्या अंतापर्यंत या पाचही शाह्या मोगल साम्राज्यांत विलीन झाल्या.१७ व्या शतकाचा अखेरीस औरंगजेबाने येथे वास्तव्य केले होते.
महाराष्ट्राचे आश्चर्य
महाराष्ट्राच्या ७ आश्चर्यांपैकी देवगिरीचा किल्ला हे एक आश्चर्य ठरले आहे.[२] महाराष्ट्रातील अद्भुत आणि देखण्या सात आश्चर्यांची जून २०१३ मध्ये घोषणा करण्यात आली. शांती-सद्भावनेचं प्रतिक ग्लोबल पॅगोडा, मुंबईच्या मध्य रेल्वेचं मुख्यालय सीएसटी स्टेशन, मध्ययुगीन काळातील एक अभेद्य किल्ला देवगिरीचा किल्ला, पश्चिम घाटातील कास पठार, स्वराज्याची पहिली राजधानी रायगड किल्ला, बुलडाण्यातील लोणार सरोवर, औरंगाबादमधील अजिंठा लेणी ही महाराष्ट्राची सात आश्चर्ये आहेत.
विशेष म्हणजे त्या गडावरील मेंढातोफ आहे. ती तोफ अतिशय अद्भुत आहे, त्या तोफेचे खासियत म्हणजे तो तोफ एक मार्यात एखादा गड किंवा किल्ला उद्ध्वस्त करण्याची क्षमता त्या मध्ये आहे. ती तोफ पंच धात़ूंनी निर्माण केली आहे.
जगभरातून मिळालेल्या २२ लाख मतांच्या आधारावर महाराष्ट्रातील सात आश्चर्य निवडली गेली आहेत.हा पर्यटनासाठी अतिशय प्रसिध्द किल्ला आहे.
No comments:
Post a Comment